भाजपमध्ये मोठे फेरबदल, विनोद तावडे बिहारचे प्रभारी तर पंकजा मुंडे... ; या राज्यांमध्येही बदल | पुढारी

भाजपमध्ये मोठे फेरबदल, विनोद तावडे बिहारचे प्रभारी तर पंकजा मुंडे... ; या राज्यांमध्येही बदल

पुढारी ऑनलाईन: भाजपने राज्यांच्या प्रभारींची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे. ओम माथूर यांची छत्तीसगडमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालची जबाबदारी मंगल पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. मंगल पांडे बिहारमध्ये आरोग्य मंत्री होते. प्रकाश जावडेकर यांना केरळचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडचे प्रभारी बनवण्यात आले आहे. बिप्लब कुमार देब यांना हरियाणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. खासदार प्रकाश जावडेकर यांना केरळचे प्रभारी तर राधामोहन अग्रवाल यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. मुरलीधर राव यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशात पंकजा मुंडे आणि डॉ.रमाशंकर कथेरिया यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.

भाजपने नव्या केल्या नियुक्त्या

आमदार विजय भाई रुपानी यांना पंजाबचे प्रभारी तर डॉ.नरेंद्रसिंग रैना यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. दादरा, नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रभारी खासदार विनाडे सोनकर यांना करण्यात आले आहे. खासदार राधामोहन अग्रवाल यांची लक्षद्वीपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरूण चुघ यांना तेलंगणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर अरविंद मेनन यांची तेलंगणचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खासदार महेश शर्मा त्रिपुराचे प्रभारी

भाजपने अरुण सिंह यांना राजस्थानचे प्रभारी केले आहे. राजस्थानमध्ये विजया रहाटकर सहप्रभारी असतील. खासदार महेश शर्मा यांना त्रिपुराचे प्रभारी बनवण्यात आले आहे. चंदीगडचे प्रभारी विजय भाई रुपाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईशान्य प्रदेशात संबित पात्रा यांची संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ऋतुराज सिन्हा हे सहसंयोजक असतील.

Back to top button