इस्लाममध्ये नमाजची सक्ती नाही, पण हिजाबची सक्ती का? : सुप्रीम कोर्ट | पुढारी

इस्लाममध्ये नमाजची सक्ती नाही, पण हिजाबची सक्ती का? : सुप्रीम कोर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिजाब प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मुस्लिम पक्षकारांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. इस्लाम धर्मामध्ये नमाज, हज यात्रा, रोजा, जकात आणि अल्लाहवर असलेली श्रद्धा हे इस्लामधील पाच तत्वे अनिवार्य नाहीत. पण हिजाब मात्र सक्तीचा कसा? असा, सवाल सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम याचिकाकर्त्यांना विचारला आहे. हा प्रश्न न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि सिधांशू धुलीया यांच्या खंडपीठाने उपस्थित केला.

यानंतर मुस्लीम याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. इस्लाममध्ये नमाज, रोजा, हज यात्रा, जकात आणि अल्लाहवर श्रद्धा या तत्वांबाबत कोणतीही सक्ती करण्यात येत नाही किंवा या तत्त्वांचे पालन केले नाही म्हणून कोणतीही शिक्षाही देण्यात येत नाही. पण इस्लाममधील तत्त्वांचे पालन करण्याची सक्ती नसणे याचा अर्थ असा नाही की, ही तत्त्वे इस्लाममध्ये महत्त्वाची नाहीत, असा युक्तीवाद मुस्लीम याचिकाकर्त्यांच्या वकीलाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला आहे.

इस्लाम धर्मात तत्वांची सक्ती करण्यात येत नाही किंवा त्याचे पालन करण्यात येत नाही म्हणून शिक्षा करण्यात येत नाही. पण इस्लामनुसार कमी महत्वाची असलेली हिजाब प्रथा सक्तीची का करण्यात आली आहे? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात आला.

हेही वाचलंत का?

Back to top button