Musk Twitter Deal : ट्वीटरची खरेदी पडणार लांबणीवर? एलन मस्क विरोधात याचिका दाखल | पुढारी

Musk Twitter Deal : ट्वीटरची खरेदी पडणार लांबणीवर? एलन मस्क विरोधात याचिका दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेस्लाच्या एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्वीटरची खरेदी (Musk Twitter Deal) केल्यानंतर सर्व काही सुरळीत पार पडण्या ऐवजी त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ होताना दिसत आहे. ट्वीटर खरेदीनंतर टेस्लाचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरल्याने मस्क यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तसेच ट्वीटर खरेदी रोखण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जात आहे. फ्लोरिडा पेंशन फंड यांनी डेलावेअर चान्सरी न्यायालयात ट्वीटरची खरेदी रोखण्यासाठी एलन मस्क आणि ट्वीटर विरोधात याचिका दाखल केली आहे.

खरेदी व्यवहार २०२५ पर्यंत थांबविण्याची विनंती

ट्वीटर खरेदी (Musk Twitter Deal) बाबत एलन मस्क आणि ट्वीटर यांच्यात झालेला व्यवहार थांबविण्यासाठी फ्लोरिडा पेंशन फंड यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत हा व्यवहार कमीत कमी २०२५ सालापर्यंत थांबविण्यात यावा असे म्हटले आहे. ट्वीटरमध्ये मस्क हे भाग धारक बनले आहेत. याचिकेनुसार उर्वरीत दोन तृतियांश समभाग मस्क यांच्या मालिकेचे होण्याच्या प्रक्रियेस तीन वर्षांचा अवधी लागण्याची शक्यता त्यामुळे या व्यवहारास २०२५ पर्यंत स्थगिती मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

एलॉन मस्क ट्वीटरचा व्यवहार (Musk Twitter Deal) करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करीत आहेत. या वर्षभरात या खरेदी बाबतचा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे. ट्विटर आणि मस्क यांच्यातील हा करार जगातील आतापर्यंतचा तिसरा सर्वात मोठा व्यवहार आहे. पण, खरेदी व्यवहारा बाबद दाखल याचिकेबाबत अद्याप एलॉन मस्क किंवा ट्वीटर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रीया समोर आलेली नाही.

एलन मस्क यांच्याकडून फंडची उभारणी (Musk Twitter Deal)

एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सला (३.३७ लाख कोटी रुपये) ट्वीटरची खरेदी केली आहे. या व्यवहारानंतर त्यांनी सांगितले की, आपण फंडची उभारणी करत आहोत. सिकोया कॅपिटल फंड ने ८० कोटी डॉलर, वाय कॅपिटलने ७० कोटी डॉलरची उभारणी केली आहे. ओरॅकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन यांनी १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे.

Back to top button