नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्लीत असलेली फटाक्यांवरील बंदी १ जानेवारी २०२३ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी ही माहिती दिली. निर्णयानुसार फटाक्यांची निर्मिती, त्याची साठवणूक, विक्री आणि फटाके फोडण्यावर बंदी असणार आहे.
दिल्लीकर नागरिकांना प्रदुषणापासून वाचविण्यासाठी फटाक्यांवर असलेली बंदी कायम ठेवली जाणार असल्याचे गोपाल राय यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. बंदीचा निर्णय प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस, डीपीसीसी तसेच महसूल विभागाची मदत घेतली जाणार आहे.
हेही वाचलंत का ?