पुढारी ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी सुप्रीम कोर्टाचे प्रथमच लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. दवे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की रमणा यांनी हाडाचे सरन्यायाधीश म्हणून आपले कर्तव्य बजावले. ते नागरिकांचे न्यायाधिश होते. याप्रसंगी त्यांना निरोप देताना ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांना अश्रू अनावर झाले. या निरोप समारंभाची महत्त्वाची बाब म्हणजे रमणा यांचे खंडपीठासमोरील कामकाजाचे २०१८ नंतर प्रथमच लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले.
१७ फेब्रुवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून एन. व्ही. रमणा यांची नेमणूक झाली होती. गेल्यावर्षी 24 एप्रिल 2021 या दिवशी रमणा यांनी सरन्यायाधीश या पदाचा पदभार स्वीकारला होता. रमणा यांच्या निवृत्तीनंतर 27 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती उदय लळीत हे देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
परंपरेनुसार, एन. व्ही. रमणा यांनी आज त्यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी देशाचे पुढील सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांच्यासोबत बेंच शेअर केला. रमणा यांच्या खंडपीठासमोर त्यांचा औपचारिक निरोप समारंभ पार पडला. यावेळी न्यायाधिश अनेक ज्येष्ठ वकिल उपस्थित होते.