

पुढारी ऑनलाईन डेस्क : बऱ्याचदा लग्न समारंभात मित्रांकडून खूप दंगा मस्ती केलेली पहायला मिळते. तसेच मित्रांपैकी काहीजण असे असतात की जे सर्वांचं लक्ष आपल्याकडे वळवू पाहत असतात. सध्या एका लग्नसमारंभातील एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नवरा शेजारी असतानाच असं काही घडतं की ते पाहून उपस्थित लोकांनी संताप व्यक्त केला. शिवाय हा व्हिडिओ पाहाणाऱ्या प्रत्येकाला देखील धक्काच बसतो. (Viral Video)
व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओवर इन्स्टाग्राम या माध्यमावर प्रतिक्रियांचा पाऊस पडलेला पहायला मिळत आहे. एका युजरने क्रिकेट कॉमेंट्री मधील "नजर हटी तो दुर्घटना घटी" हे प्रसिद्ध वाक्यच प्रतिक्रियेत लिहले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जे घडलं ते पाहून डोक्याला हात लावून या नवऱ्याचं सगळं काही लग्नापूर्वी गेलं अशीच प्रतिक्रिया प्रत्येकाची असेल. नवऱ्या मुलाचे नवरीवरचं लक्ष हटले तर त्याचा फायदा तिसऱ्या व्यक्ती कसा घेतो हे या व्हिडिओमधून समोर येते. एखादं लग्न असंपण पहायला मिळेल याचा आपण कधी विचारपण केला नसेल. (Viral Video)
लग्नाला आलेले सर्व नातेवाईक पाहुणे, मित्र हे नवरा आणि नवरी दोघांनाही भेटी देत असतात. नवरा नवरी दोघेही फार खूश आहेत कारण त्या दोघांचा एक नवा संसार उभा राहणार आहे. पण या लग्नातील नवऱ्याला सर्वांची विचारपूस करणे अंगाशी आले. कारण एक तरूण नवरामुलगा पाहूण्यांना भेटत असताना नवरीला कुंकू फासताना दिसला. तो हे कुंकू नवऱ्यामुलाचा डोळा चुकवून लावताना दिसतो. हे सर्व नातेवाईक, मित्रमंडळीही पाहत असतात. हे सर्व पाहून नवऱ्या मुलाने देखील संताप व्यक्त केला. या तरूणानं नेमकं असं का केलं याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. पण हे मात्र नक्की की अशी करामत लग्नात करणे हे फार चुकीचे आहे.
नवरी मुलीचा आणि नवऱ्या मुलाचा मित्रपरिवार नवनवीन कल्पना काढून गंमती जमती घडवून आणत असतात. लग्नात अनेकदा बूट, चप्पल पळविण्याचे किस्से पहायला मिळतात. या लग्नातही एका बहाद्दराने अशी काही युक्ती काढली असावी की ज्यानं लोक अवाक झाले.
हेही वाचा