Asia Cup 2022 : दुबळ्या हाँगकाँगवर टीम इंडियाचा ४० धावांनी सहज विजय; सुपर ४ मध्ये एन्ट्री | पुढारी

Asia Cup 2022 : दुबळ्या हाँगकाँगवर टीम इंडियाचा ४० धावांनी सहज विजय; सुपर ४ मध्ये एन्ट्री

दुबई; पुढारी ऑनलाईन : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) मध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल्या नंतर गुरुवारी भारताने दुबळ्या हाँगकाँगला ४० धावांनी सहज पराभूत केले. अशा पद्धतीने भारत सुपर ४ मध्ये पोहचणारा अफगाणिस्तान नंतर दुसरा संघ ठरला. हाँगकाँगच्या गोलंदाजांचा समाचार घेताना भारताच्या फलंदाजांनी १९३ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ ५ बाद १५२ पर्यंतच मजल मारु शकला. हाँगकाँगच्या बाबर हयात, किंचित शाह आणि जिशान अली या तिघांना वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. तर भारताकडून चार गोलंदाजांनी प्रत्येक एक बळी घेतला व रवींद्र जडेजाने अफलातून क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवत अप्रतिम थ्रो वर एका फलंदाजास धावबाद केले.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यास उतरलेल्या हाँगकाँगने चांगला प्रतिकार केला. हाँगकाँगकडून बाबर हयात याने ३५ चेंडूत ४१, किंचित शाह याने २८ चेंडूत ३१ धावा तर अखेरच्या षटकांमध्ये जिशान अली याने १७ चेंडूत २६ धावा केल्या. या व्यतिरिक्त हाँगकाँगच्या इतर फलंदाजांना फारशा धावा करता आल्या नाहीत. भारताकडून युवा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग याने दुसऱ्या षटकात हाँगकाँगला पहिला झटका दिला. अर्शदीप सिंगसह भूववनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा आणि आवेश खान यांनी प्रत्येक एक बळी मिळवला. तर युजवेंद्र चहलला बळी घेण्यात अपयश आले. या सामन्यात मागील सामन्याचा स्टार हार्दीक पंड्याला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे पाचवा गोलंदाज म्हणून या सामन्यात अर्धशतक झळकावत फाॅर्ममध्ये येत असल्याचा संकेत देणारा विराट कोहलीने देखिल एक षटक टाकले. या षटकात त्याने ६ धावा दिल्या.

तत्पर्वी, हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी (Asia Cup 2022)  करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 192 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 68 धावा कुटल्या. त्याचवेळी विराट कोहलीने 44 चेंडूत 59 धावा फटकावल्या. कोहलीने 6 महिने आणि 11 डावांनंतर अर्धशतक झळकावले आहे. विराटने 18 फेब्रुवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. त्या सामन्यात त्याने 41 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 32 महिन्यांनंतर T20 क्रिकेटमध्ये सलग 3 सामन्यांमध्ये 10 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. शेवटच्या वेळी जानेवारी 2020 मध्ये सलग 3 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून 10 पेक्षा जास्त धावा आल्या.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हाँगकाँगविरुद्धही मोठी इनिंग खेळू शकला नाही. त्याने केएल रहुलसोबत चांगली सुरुवात केली, पण तो 12 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. त्याची विकेट भारतीय वंशाच्या आयुष शुक्लाने घेतली. (Asia Cup 2022)

रोहितचा विश्वविक्रम… (Asia Cup 2022) 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हाँगकाँगविरुद्ध पहिली धाव घेताच विश्वविक्रम केला. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3500 धावा करणारा रोहित जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

भारताचा संघ…

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

हाँगकाँगचा संघ…

निझाकत खान (कर्णधार), यासीम मोर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेनी (विकेटकीपर), झीशान अली, हारून अर्शद, एहसास खान, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला

Back to top button