Rohit Sharma Record : रोहित शर्माचा T20 मध्ये नवा विश्वविक्रम!, एक धाव घेताच… | पुढारी

Rohit Sharma Record : रोहित शर्माचा T20 मध्ये नवा विश्वविक्रम!, एक धाव घेताच...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये 3500 धावा करणारा तो जगातील पहिला पुरुष फलंदाज ठरला आहे. आशिया चषक सामन्यात (Asia Cup 2022) भारतीय कर्णधाराने हा विक्रम केला. हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात सलामीला उतरल्यानंतर एक धाव काढताच त्याने हा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक 4 शतके रोहितच्या नावावर आहेत.

आशिया कप T20 स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात (Ind vs HK) हाँगकाँगने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. जर भारताने आजचा सामना जिंकला तर तो सुपर फोरमध्ये पोहोचेल. रोहितने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंत खेळत आहे. पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. (Rohit Sharma Record)

या सामन्यापूर्वी रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय T20 च्या 125 डावात 32 च्या सरासरीने 3499 धावा केल्या होत्या. तो आधीच सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 118 धावांची सर्वोत्तम खेळी. 4 शतकांव्यतिरिक्त त्याने 27 अर्धशतकेही झळकाली आहेत. 300 हून अधिक चौकारांशिवाय 150 हून अधिक षटकार मारले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 140 आहे. (Rohit Sharma Record)

Back to top button