काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक; ईटलीत निधन | पुढारी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक; ईटलीत निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो यांचे २७ ऑगस्टला निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. मंगळवारी (दि. ३०) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनिया गांधी मागील आठवड्यात त्यांच्या आईची भेट घेण्यासाठी इटलीत गेल्या होत्या. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्राही मागील आठवड्यापासून इटलीला गेले होते.

दरम्यान, सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी महासचिव जयराम रमेश यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा गेल्या काही वर्षांपासून अनेकदा आजींची भेट घेण्यासाठी इटलीला जात होते. राहुल गांधींना सततच्या विदेश दौऱ्यामुळे टीकेलाही सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button