कोल्‍हापूर : मुस्लिम तरुणाची गणपती नेण्यासाठी मोफत रिक्षा सेवा; पाच वर्षांपासूनचा उपक्रम | पुढारी

कोल्‍हापूर : मुस्लिम तरुणाची गणपती नेण्यासाठी मोफत रिक्षा सेवा; पाच वर्षांपासूनचा उपक्रम

वडणगे (कोल्‍हापूर), पुढारी वृत्‍तसेवा : कोल्‍हापूर शहरात मुस्लिम कुटुंबातील रिक्षाचालक इरफान किल्लेदार यांनी बुधवारी (दि.31) दिवसभरात तब्बल 63 गणेशभक्तांची गणेशमूर्ती आणण्यासाठी आपल्या रिक्षातून मोफत घरपोच सेवा दिली. इरफान हे गेली पाच वर्षे आपल्या रिक्षातून गणेशभक्तांना गणपतीमूर्ती घरपोच ही मोफत सेवा देत आहेत. यंदाच्या वर्षीही त्यांनी सोसायटी हॉल, साखळकर गल्ली, भगवा चौक येथून जाधव मळा, इंदिरा नगर, माळवाडी, निगवे येथील गणेशभक्तांना ही सेवा दिली.

केवळ आपण समाजाचे काही देणं लागतो, हा एकमेव उद्देश ठेवून, आपल्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन समाज सेवेचा वसा घेत श्री गणेशाच्या श्रद्धेपोटी आपण ही सेवा देत असल्याचे इरफान किल्लेदार यांनी सांगितले. हे कार्य करीत असताना अशावेळी भाविकांचा आनंद, लहान मुलांची हौस, उत्साह पाहण्यासारखा असतो. वडिलांसमान व्यक्तींचा लाखमोलाचा आशीर्वाद या सेवेमुळे मिळतो. यातच मी समाधानी आहे. तसेच यापुढे सातत्याने ही मोफत सेवा देण्याचे व्रत कायम ठेवणार असल्याचे इरफान यांनी सांगितले.

हेही वाचा 

रोहित पवार फडणवीसांना भेटले! मतदारसंघातील कामांना गती देण्याची मागणी; महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

कोल्‍हापूर जिल्ह्यातील ‘ही’ सात खेडी प्राथमिक सुविधेपासून अनेक वर्षे वंचित

कोल्‍हापूर : राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे : मंत्री राधाकृष्‍ण विखे-पाटील

Back to top button