भारताच्या जीडीपीत १३.५ टक्क्यांची वृद्धी; अर्थव्यवस्थेची ताजी आकडेवारी जाहीर | पुढारी

भारताच्या जीडीपीत १३.५ टक्क्यांची वृद्धी; अर्थव्यवस्थेची ताजी आकडेवारी जाहीर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) देशाची अर्थव्यवस्था 13.5 टक्के दराने वाढली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत 13.5 टक्के नोंदवला गेला आहे, जो जानेवारी-मार्च तिमाहीतील 4.1 टक्के इतका होता. मागील आर्थिक वर्षाच्या एप्रिल – जून तिमाहीत (2021-22) जीडीपी वाढीचा दर 20.1 टक्के इतका होता.

रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा जीडीपी कमी

तुलनात्मक आधाराचा विचार करता अनेक विश्लेषकांनी देशाचा आर्थिक विकास दर दुहेरी अंकात राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. रेटिंग एजन्सी ICRA ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर 13 टक्के असेल, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार तो 15.7 टक्के असेल. या महिन्यात पतधोरण आढाव्यात, रिझर्व्ह बँकेने 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत GDP वाढीचा दर सुमारे 16.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. 2022 च्या एप्रिल-जून तिमाहीत चीनचा विकास दर 0.4 टक्के राहिला आहे.

Back to top button