Anna Hazare letter : अण्णा हजारेंनी केजरीवालांना सुनावले खडेबोल, म्‍हणाले, “मुख्यमंत्री झाल्यापासून…” | पुढारी

Anna Hazare letter : अण्णा हजारेंनी केजरीवालांना सुनावले खडेबोल, म्‍हणाले, "मुख्यमंत्री झाल्यापासून..."

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्ली सरकारच्या मद्य धोरणामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सीबीआयच्या रडारवर असताना आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दारुविक्रीच्या मुद्यावरुन आम आदमी पक्षाच्या सरकारला घेरले आहे. अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून ( Anna Hazare letter) दिल्लीतील दारुची दुकाने बंद करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून केजरीवाल यांनी आदर्शवादापासून फारकत घेतल्याचा दावा ही हजारे यांनी केला आहे.

Anna Hazare letter : केजरीवालांनी केले होते राळेगणसिद्धीत दारुबंदीचे कौतुक

‘अरविंद केजरीवाल हे राळेगणसिद्धीत आले होते, तेव्हा त्यांनी इथल्या दारू,सिगारेट आणि विडीबंदीचे कौतुक केले होते. राजकरणात येण्याआधी त्यांनी लिहिलेल्या ‘स्वराज’ पुस्तकातही दारुबंदी, ग्रामसभा अशा मुद्यांवर मोठमोठ्या गोष्टी लिहिल्या होत्या.त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा होत्या.परंतु मुख्यमंत्री झाल्यापासून ते आदर्शवादापासून दूर गेले आहेत,असे अण्णा हजारे यांनी पत्रातून लिहले आहे.

ऐतिहासिक चळवळ उद्‌ध्वस्त करून स्थापन झालेल्या पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर

सरकार कुठल्याही पक्षाचे असो, सरकारला जनहिताचे काम करण्यास भाग पाडण्यासाठी समविचारी लोकांना दबाबगट असणे गरजेचे होते, तसे झाले असत तर देशात परिस्थिती वेगळी असती आणि गरिबांना लाभ झाला असता. परंतु, दुदैवाने तसे झाल नाही. त्यानंतर तुम्ही मनीष सिसोदिया आणि अन्य सहकार्यांनी मिळून पक्ष स्थापन केला. ऐतिहासिक चळवळ उद्‌ध्वस्त करून स्थापन झालेल्या पक्षही इतर पक्षांच्या वाटेवर जावू लागला ही खेदाची बाब आहे,असे खडे बोल हजारे यांनी केजरीवाल यांना पत्रातून सुनावले आहे.

संबंधित बातम्या

अण्णा हजारे यांच्या आंदोलनपासूनच देशाला खऱ्या अर्थाने केजरीवाल यांनी ओळख झाली होती.त्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करुन दिल्ली व पंजाबमध्ये सरकार स्थापन केल.पंरतु, त्यानंतर अण्णा व केजरीवाल यांच्यात दुरावा आला होता. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून सध्या केजरीवाल यांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहे.

युपीए सरकारच्या काळात दिल्लीत केलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर अण्णा हजारे यांनी गेल्या काही वर्षात कुठलही मोठ आंदोलन केल नाही. देशात महागाई , बेरोजगारी वाढली असताना व भ्रष्टाचार संपुष्टात आलेला नसताना अण्णा शांत कसे, असेही प्रश्नही विरोधकांनी अनेकदा उपस्थित केले आहेत. आता अण्णांनी थेट दिल्लीतील दारु विक्रीचा मुद्दा हाती घेत केजरीवालांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा

Back to top button