आशियामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

आशियामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या अमृता रुग्णालयाचे उद्घाटन आज ( दि. २४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. दिल्लीला लागूनच असलेल्या फरिदाबादमध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. उद्घाटन समारंभास अमृतानंदमयी मठाच्या प्रमुख माता अमृता, हरियानाचे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर, उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला आदी मान्यवर उपस्थित होते.

बेड क्षमता २६०० आणि ९१ प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध

माता अमृतानंदमयी मिशन ट्रस्टच्या वतीने अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेले हे रुग्णालय टप्प्या-टप्प्यात विकसित केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रुग्णांसाठी 550 बेड्स उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयाची एकूण बेड क्षमता २६०० इतकी आहे. सर्व प्रकारच्या रुग्णांना याठिकाणी माफक दरात उपचार मिळतील. रुग्णालयात कार्डियाक सायन्स, न्यूरो सायन्स, गॅस्ट्रो सायन्स, ट्रॉमा विभाग, माता आणि मुलांचा विभाग यासह 91 प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध असणार आहेत. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील लोकांना प्रामुख्याने या रुग्णालयाचा लाभ मिळेल. पुढील दोन वर्षांच्या काळात रुग्णालयातील बेड संख्या 750 वर नेली जाईल तर नंतर ही संख्या 2600 वर नेली जाईल, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. संजीव सिंग यांनी सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button