Indian Tourism : भारतातील काही धार्मिक स्‍थळे जिथं तुमची राहण्‍याची व्‍यवस्‍था हाेईल अगदी ‘फ्री’! | पुढारी

Indian Tourism : भारतातील काही धार्मिक स्‍थळे जिथं तुमची राहण्‍याची व्‍यवस्‍था हाेईल अगदी 'फ्री'!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  आपण दरवर्षी धार्मिक स्‍थळांना जाण्‍याचे प्लॅन करतोच. मात्र बर्‍याचवेळा आपण ताे बदलताेही. या मागील सर्वात महत्त्‍वाचे कारण म्हणजे ‘बजेट’. हो हे खरच आहे, प्लॅन करताना आपण ठिकाण ठरवतो; पण जेव्हा खर्च कॅलक्युलेट करू लागतो, तेव्हा बजेटवरून आपण माघारी (Indian Tourism) फिरतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही धार्मिक ठिकाणांबद्दल सांगणार आहे, जिथे तुम्ही अगदी ‘फ्री’ मध्ये राहू (स्टे ) शकता. चला तर पाहूयात  कोणती आहेत ही ठिकाणे…

शांतिकुंज, हरिद्वार

हरिद्वार हे भारतातील धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे. येथील घाट गंगा आरती पाहण्यासारखी असते, त्यामुळे तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत ऋषिकेशला जाण्याचा (Indian Tourism) विचार करू शकता. तर तुम्ही गायत्री कुटुंबाच्या काळातील हरिद्वारमधील शांतीकुंजमध्ये माेफत मुक्कामाची व्‍यवस्‍था आहे.

आनंद आश्रम, केरळ

केरळमध्‍ये जाण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर, येथील हिरवाईत वसलेल्या आनंदआश्रमात तुम्ही थांबू शकता. तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय (Indian Tourism) आहे. याठिकाणी तुम्हाला जेवण देखील मिळू शकते. येथे मिळणाऱ्या जेवणाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे कमी तेल आणि कमी मसाल्यांमध्ये बनवले जाते. जे तुमच्या आरोग्यासाठीसुद्धा चांगले आहे.

 गीता भवन, ऋषिकेश

तुम्ही ऋषिकेश येथे जाण्‍याचे नियाेजन करणार असला तर राहण्याची काळजी करण्याची गरज नाही. गीता भवन या १००० खोल्यांच्या प्रशस्त आश्रमात (Indian Tourism) तुमची ‘फ्री’ मध्ये राहण्याची सोय होऊ शकते. या आश्रमातून तुम्ही गंगेच्या नयनरम्य दृश्यांचाही आनंद घेऊ शकता.

 ईशा फाऊंडेशन, कोईम्बतूर

कोईम्बतूरपासून ४० किलोमीटर अंतरावर ईशा फाऊंडेशन हे श्री सद्गगुरूंचे धार्मिक केंद्र आहे. याठिकाणी आदियोगी शिवाची मूर्ती आहे. हे एक योगकेंद्र (Indian Tourism) म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेकप्रकारचे सामाजिक, धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात. याठिकाणी कोणतेही शुल्क न देता तुम्ही राहू शकता.

 हेमखंड साहिब गुरूद्वार, उत्तराखंड

उत्तराखंडमधील हेमखंड साहिब गुरूद्वार येथे किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये ट्रेकिंग करण्यासाठी तुम्ही जात असाल तर, येथील गोविंद घाट येथे कोणतेही वाहन जात नाही. त्यामुळे प्रवाशांना हेमखंड साहिब गुरूद्वार प्रवाशांना मोफत राहण्याची परवानगी देत असतो. हा गुरूद्वार अलकनंदा नदीच्या काठावर वसलेला असल्याने याठीकाणचे निसर्गसौदर्य अप्रतिम आहे. या ठिकाणी तुम्ही मोफत जेवणाचा आनंदही घेऊ शकता.

हेही वाचा:

 

 

Back to top button