अश्लील चित्रफीत प्रकरण : मी निर्दोष आहे ! राज कुंद्राचं कोर्टात अपील | पुढारी

अश्लील चित्रफीत प्रकरण : मी निर्दोष आहे ! राज कुंद्राचं कोर्टात अपील

पुढारी ऑनलाईन डेस्क:  अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा याचे पोर्नोग्राफी व्यवसायातील लागेबांधे समोर आले आणि बॉलिवूडसह अनेकांना धक्का बसला. बरेच आठवडे पोलीस कोठडीत राहिल्यानंतर राजला जामीन मिळाला होता. यानंतर वातावरण निवळत असतानाच राजने कोर्टात अपील केलं आहे की त्याला आरोपातून मुक्त केलं जावं. अर्थात राज म्हणतो त्याप्रमाणे ते तितकं सहजशक्यही नाहीये.

सरकारी वकिलांचा राजच्या या याचिकेवर विरोध आहे. त्याच्यामते राजाच्या विरोधात असलेल्या अनेक पुराव्यांमुळे त्याची इतकी सहज निर्दोष मुक्तता होणं शक्य नाही. प्राथमिकदृष्ट्या असलेल्या पुराव्यांवरून असं दिसून येत आहे की राज थेट पोर्नोग्राफी जगताशी जोडले गेले होते. हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावेदेखील उपलब्ध आहेत.  तर यावर राजच्या वकिलांचं म्हणणं मात्र वेगळंच आहे. ते म्हणतात ‘आम्ही कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी तयार आहोत.

आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे. राज यांच्यावर आरोप असले तरी त्यात कितपत तथ्य आहे हे आम्ही समोर आणूच. यासंदर्भात तथ्य असलेले युक्तिवाद करण्याची आमची तयारी आहे. मागील वर्षी क्राईम ब्रांचने राजला पोर्नोग्राफी व्यवसायात सहभाग असल्याकारणावरून अटक केली होती. याप्रकरणात राजाला जवळपास २ महिने जेलची हवा खावी लागली होती. याप्रकरणी शिल्पाचा सहभाग असल्याची शक्यता गृहीत धरून क्राईमबी ब्रांचने तिचीही चौकशी केली होती. याप्रकरणात अभिनेत्री घाणा वशिष्ठचं नावही समोर आला होतं.

Back to top button