Viral Video : फूटबॉल मॅचमधील 'हा' व्‍हिडिओ तुम्‍हाला देईल जगण्याची शिकवण | पुढारी

Viral Video : फूटबॉल मॅचमधील 'हा' व्‍हिडिओ तुम्‍हाला देईल जगण्याची शिकवण

पुढील ऑनलाईन डेस्‍क : सोशल मीडियामध्‍ये दररोज हजारो व्‍हिडिओ व्‍हायरल होत असतात. त्‍यातील काही तुमचे मनोरंजन करतात तर काही व्‍हिडिओमुळे तुम्‍ही अचंबितही होता. मात्र निवडक व्‍हिडिओ हे तुम्‍हाला आयुष्‍याकडे कसे पाहावे, याची शिकवण देणार असतात. असाच एका फुटबॉल मॅच दरम्‍यानचा व्‍हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. जाणून घेवूया, या व्‍हिडिओमध्‍ये नेमक काय आहे…

ट्वीटरवर हा व्‍हिडिओ शेअर करण्‍यात आला आहे. या व्‍हिडिओमध्‍ये एका फुटबॉल मॅच सुरु असल्‍याचे दिसते. एक खेळाडू प्रतिस्‍पर्धी संघाविरोधात पेनल्टी किक मारतो. क्षणभर असे वाटते की गोल होणार; पण चेंडू हा गोल पोलला लागून उंच हवेत उडतो. गोलकिपर जोरदार जल्‍लोष करायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे ज्‍याने पेनल्‍टी किक मारली हा खेळाडू निराश होवून जमिनीवर बसतो. मात्र दोन्‍ही खेळाडूंचे लक्ष चेंडूकडे नसते. चेंडू हवेत असतो तेव्‍हाच सामन्‍याचा सुर पालटलेला असतो. कारण चेंडू हवेत उडून पुन्‍हा गोलमध्‍ये जातो. आणि अवघ्‍या काही क्षणात जल्‍लोष करत असणार्‍या गोलकिपरच्‍या पदरी निराशा पडते.

काय शिकवण देतो हा व्‍हिडिओ?

हा व्‍हिडिओ तुम्‍हाला आयुष्‍य जगताना चार गोष्‍टी शिकवतो. पहिली तुम्‍हाला आनंदीत करणारी कोणतीही गोष्‍ट घडली तरी कधीच घाईगडबडीत जल्‍लोष करु नका. दुसरा जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मनातील आशा सोडू नका, तिसरी गोष्‍ट म्‍हणजे नेहमीच आपल्‍या वेळेची प्रतीक्षा करा कारण वेळ बदलण्‍यास फार काळ लागत नाही आणि चौथी तुमच्‍या जगण्‍यातील प्रत्‍येक क्षण हा अमूल्‍य आहे. तो कधीच वाया घालवू नका. हा व्‍हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केला आहे. आतापर्यंत तो तीन लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. तर १२ हजारांहून अधिक जणांनी या व्‍हिडिओला लाईक केले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button