युपीएससी परीक्षेत उत्तर काढण्याच्या ट्रिक सांगणारा व्हिडिओ होतोय व्हायरल…. | पुढारी

युपीएससी परीक्षेत उत्तर काढण्याच्या ट्रिक सांगणारा व्हिडिओ होतोय व्हायरल....

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होतचं असतं. गेले काही दिवस सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक शिक्षक युपीएससी (UPSC) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे की, परीक्षेत उत्तर  काढताना कोणत्या ट्रिक वापरायच्या. पाहूया नेमकं काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये.

युपीएससी (UPSC) करणाऱ्या विद्यार्थ्यांच प्रमाण खूप आहे. त्या पदाच्या माध्यमातून करता येणारी कार्य. त्या पदाची प्रतिष्ठा, मिळणार वेतन यामुळे या परीक्षांचा अभ्यास करणारा वर्ग खूप मोठा पाहायला मिळतो. तुमच्याच आजुबाजूला पाहिले तर तुम्हाला तुमच्या आजुबाजूला एक-दोन तरी युपीएससीचा अभ्यास करणारे आढळतील आणि दिवसेंदिवस या परीक्षांकडे वळणारा विद्यार्थ्यांचा कल अधिक पाहायला मिळत आहे. जसा या परीक्षांचा अभ्यास करणारा वर्ग वाढत आहे तसाच क्लासेस पण वाढत आहे हे जाणवेल.

कसा अंदाज लावायचा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत आहे की अंदाज लावून उत्तरं कशी काढायची. त्याने यूपीएससी पूर्व परीक्षेत कसा अंदाज लावायचा हे सांगितले. परीक्षेत जर का नकारात्मक गुण १/४ असेल तर अंदाज लावून केलेले उत्तर हे बरोबर असेल. नकारात्मक गुण १/३ असेल तर उत्तर हे बरोबर किंवा चूक असेल. नकारात्मक गूण १/२ असेल तर अंदाज लावून काढलेले उत्तर हे चूकच असेल.

आयएएस अवनिश शरण यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी युझर्सना प्रश्न केला आहे की, तुम्ही यावर गंभीर आहात का? (Are You Serious!!). अवनिश शरण यांच्या बरोबरच सोशल मीडिया युझर्सनेही कॉमेंट केली आहे. एकजण म्हणतं आहे की, असा अंदाज लावून जीवन नाही चालत. तर काहीजण शिक्षकाच्या मार्गदर्शनाचे समर्थन करत आहेत.

Back to top button