Accident: हातात पिस्तूल अन् वेगात दुचाकी.., 'ते' रील ठरलं शेवटचं! ३ भावांचा जागीच मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारा Video

सोशल मीडियासाठी 'रील' बनवण्याचे वेड तरुणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यात घडली आहे.
MP road accident news
MP road accident newsfile photo
Published on
Updated on

MP Accident Viral Video

मध्य प्रदेश: सोशल मीडियासाठी 'रील' बनवण्याचे वेड तरुणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यात घडली आहे. नॅशनल हायवेवर वेगाने दुचाकी चालवत आणि हातात बंदूक नाचवत रील बनवण्याच्या नादात तीन सख्ख्या भावांना आपला प्राण गमवावा लागला आहे. उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या घटनेत अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MP road accident news
Amravati Accident | चहा प्यायला गेलेल्या ४ तरुणांवर काळाचा घाला: अमरावती - अकोला महामार्गावर कारचा भीषण अपघात; ३ जण गंभीर

पन्नी पथरिया परिसरात हा अपघात झाला. बेला गावातील उपलक्ष कोल (१७), अमरीश कोल (२२) आणि हेमराज कोल (१७) हे तीन भाऊ एका पल्सर दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांचा दुसरा एक मित्र दुसऱ्या दुचाकीवरून त्यांच्या मागे येत रील शूट करत होता. अतिवेगात असलेल्या पल्सरवरील तरुणांपैकी एकाच्या हातात कट्टा (देशी बनावटीचे पिस्तूल) असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

समोरून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना, रस्त्याच्या कडेला विटांनी भरलेला एक ट्रेलर उभा होता. दुचाकीचा वेग इतका प्रचंड होता की नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट ट्रेलरला जाऊन धडकली. यामध्ये तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.

या तिघांचे रील शूट करणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवर असलेले प्रशांत द्विवेदी आणि प्रदीप द्विवेदी हे दोन भाऊदेखील त्याच उभ्या ट्रेलरला जाऊन धडकले. या धडकेत ते दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

MP road accident news
मिनी ट्रॅव्हल्स-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ९ जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news