Amravati Accident | चहा प्यायला गेलेल्या ४ तरुणांवर काळाचा घाला: अमरावती - अकोला महामार्गावर कारचा भीषण अपघात; ३ जण गंभीर

Amravati Akola Highway Accident : जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक
 Badnera Youth Car Crash
Badnera Youth Car CrashPudhari
Published on
Updated on

Badnera Youth Car Crash

अमरावती : जिल्ह्यातील जुनी वस्ती बडनेरा येथील तरुणांवर काळाने घाला घातला आहे. अमरावती ते अकोला महामार्गावर सोमवारी (दि.६) रात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण बडनेरा परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सातही मित्र काल रात्री चहा पिण्यासाठी कारने बेलोरा विमानतळ येथील सलीम चायवाला यांच्याकडे गेले होते. तिथून परत येत असताना महामार्गावर त्यांची कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकली. मात्र पोलीस त्यांच्या कारला अज्ञात ट्रकने धडक दिली का या बाजूनेही तपास करत आहेत. या भीषण अपघातात मो. अनस मो. सईद, मो. तलहा मो. अनिस, मो. अवेज मो. सईद आणि अ. अनवेस अ. सलीम या चार तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्व तरुण २० ते २६ वर्ष वयोगटातील होते.

 Badnera Youth Car Crash
Amravati Accident | धारणी-परतवाडा मार्गावर पिकअप दरीत कोसळून २ मजूर महिला ठार, ६ जखमी

या अपघातात अनस अनिस खान, मो. असद आणि मो. हुजेफा हे तीन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील सर्व तरुण हे बडनेरा येथील इस्लामी चौक आणि अलमास गेट परिसरातील रहिवासी आहेत.

आज मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यावर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. आज मंगळवारी उशिरा रात्री जुनी वस्ती बडनेरा येथील कब्रस्तानात त्यांच्यावर दफन विधी करण्यात येणार आहे. तरुण मुलांचा असा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news