

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सीबीआय कधीकाळी पिंजऱ्यातला बंद पोपट होता, तो आता स्वतंत्र झाला असून, त्याचे पंख भगवे झाले असल्याची कडवी टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी शनिवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. दिल्लीच्या मद्य धोरणात बदल करुन मोठा घोटाळा करण्यात आल्याच्या आरोपावरुन सीबीआयने अलिकडेच उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत सिब्बल यांनी ही टीका केली आहे.
केवळ सीबीआयच नव्हे तर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीचे पंखदेखील भगवे झाले असून मालक जे सांगेल तेच हे पोपट करीत असल्याचा टोला मारुन सिब्बल म्हणाले की , देशाच्या राजकारणात अरविंद केजरीवाल यांचा उदय होत आहे. अशावेळी त्यांना अस्थिर करण्याच्या प्रयत्नात भाजप लागली आहे. सीबीआय आणि ईडी या स्वतंत्र संस्था नसून ते सरकारचे दोन हात बनले आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा