नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक | पुढारी

नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

दीड लाख रुपये दे, तुला घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो असे आमिष दाखवून एकाची सुमारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नाशिकच्या येवला शहरात घडली आहे. येवला शहरातील जाकीर अब्दुल रहमान शहा (28) या विद्यार्थ्यास पाच जणांनी मिळून तब्बल एक लाख 25 हजारांना गंडा घातला.

जाकीर अब्दुल रहमान शहा या तरुणाला फार्मसीची डिग्री हवी होती. दरम्यान तो काही व्यक्तीच्या संपर्कात आला. या तरुणांनी घरबसल्या फार्मसीची डिग्री आणून देतो असे आमिष दाखवून या बदल्यात दीड लाख रुपये व शैक्षणिक कागदपत्रांची मागणी केली. दरम्यान तडजोड करून सव्वा लाख रुपयांवर फार्मसीची डिग्री देण्याचे ठरले.

त्यानुसार बंगलोर येथील कॉलेजला अॅडमिशन घेतली. संबधितांनी युवकाकडून सव्वा लाख रुपये उकळले, मात्र प्रवेश फी भरली नाही. परंतु, बरेच दिवस होऊनही डिग्री न मिळाल्यामुळे तसेच मूळ कागदपत्र आणि रक्कम परत न मिळाल्यामुळे आपली फसवणूक झाली आहे, हे शहा यांच्या लक्षात आले. त्यानुसार या प्रकरणात जाकीर रफिक कुरेशी, गुफरान खान मोहम्मद अली, पाशा मुर्शिद अली, सविता मनोज तिवारी व मनोज कुमार तिवारी या पाच जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक शिरुड हे करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button