पंतप्रधानपदाच्या दाव्यावर नितीश कुमार म्हणाले, अनेकांचे फोन येत आहेत; 2024 येऊ द्या… मग बघू | पुढारी

पंतप्रधानपदाच्या दाव्यावर नितीश कुमार म्हणाले, अनेकांचे फोन येत आहेत; 2024 येऊ द्या... मग बघू

पुढारी ऑनलाईन: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2024 निवडणुकीबद्दल शुक्रवारी उघडपणे प्रतिक्रिया दिली. माझ्या मनात असा कोणताही विचार नाही, असे ते म्हणाले. सर्वांसाठी काम करणे हे माझे काम आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र काम करतील यासाठी मी प्रयत्न करेन. जर त्यांनी तसे केले तर ते खूप चांगले होईल. पुढे नितीश कुमार म्हणाले, पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत अनेकांचे फोन येत आहेत. 2024 येऊ द्या, मग बघू. त्याचवेळी भाजपसोबतची युती तोडण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून माझ्या पक्षातील लोकांचे काय होते. लोकांना खूप त्रास होत होता. सर्वजण म्हणाले, पक्ष सुरक्षित रहावा. म्हणून आम्ही वेगळे झालो.

देश संविधानाने चालवला जातो

ईडी आणि सीबीआयच्या गैरवापराच्या प्रश्नावर नितीश कुमार म्हणाले, जे लोक ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत आहेत, त्यांना लोक बरोबर बघून घेईल. आता एक-एक गोष्ट सर्वांसमोर येईल. देश हा संविधानानुसार चालतो. केंद्राला काय करायचे आहे, राज्यांचे अधिकार काय आहेत? हे सर्व आधीच ठरेललं आहे.

10 लाख नोकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या 10 लाखांच्या आश्वासनाबद्दल आम्ही प्रयत्न करत आहोत आणि 10 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तेजस्वी यादव यांनी जे काही वचन दिले आहे ते खरे आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. त्याचवेळी तेजस्वी यादव यांना Z+ सुरक्षा कवच देण्याच्या प्रश्नावर नितीश कुमार म्हणाले की, विरोध का केला जात आहे? ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना संरक्षण का मिळू नये?

गिरीराज सिंह – तेजस्वी यादव ट्विटरवर भिडले

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यात ट्विटरच्या माध्यमातून लढाई सुरु आहे. 10 लाख नोकऱ्या देण्याच्या आश्वासनावरून केंद्रीय मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना घेरले असतानाच, तेजस्वी यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. गिरीराज सिंह यांनी तेजस्वी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते बिहारमधील तरुणांना 10 लाख नोकऱ्या देण्यासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत.

Back to top button