मूत्रपिंडासंबंधीत विकारग्रस्तांसाठी 'नीरा केएफटी' ठरतेय वरदान! | पुढारी

मूत्रपिंडासंबंधीत विकारग्रस्तांसाठी 'नीरा केएफटी' ठरतेय वरदान!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील जवपळपास १५ टक्के नागरिक मूत्रपिंडा संबंधीत आजाराने ग्रस्त आहेत. शिवाय देशात मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाच्या विकाराने ग्रस्त जवळपास ५० टक्के नागरिक मूत्रपिंडाचा तीव्र विकारांनी (सीकेडी) ग्रस्त आहेत. भारतातील संशोधकांनी विकसित केलेल्या ‘नीरा केएफटी’ या सर्व विकारांवर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अशात कोरोना महारोगराईच्या काळात या रूग्णांना वेळेवर उपचार मिळणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. पंरतु, एका आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित शोध निबंधानूसार भारतातील संशोधकांनी विकसित केलेल्या ‘नीरा केएफटी’ या सर्व विकारांवर प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

२० हून अधिक वनौषधींने बनवण्यात आलेल्या नीरी केएफटी औषध मुत्रपिंड पुर्नजीवित करण्यासह डायलिसिसचे प्रमाण कमी करण्यात प्रभावी असल्याचा दावा अभ्यासातून हाती आलेल्या निष्कर्षाअंती करण्यात आला आहे.

डायलिसिस वर असलेल्या रूग्णांवर या औषधाचा बराच सकारात्मक परिणाम दिसून आला आहे, हे विशेष. सौदी जर्नल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस मध्ये प्रकाशित अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील जामिया हमदर्द विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फॉर्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या तज्ञांनी यासंबंधीचा अभ्यास केला आहे.

मूत्रपिंडाची सूक्ष्म संरचना तसेच कार्यप्रणालीचा उपचार करण्यात नीरी केएफटी बरीच प्रभावकारक असल्याचे दिसून आले आहे. मूत्रपिंडाचा तीव्र विकारांनीग्रस्त रूग्णांसाठी हे औषध बरचे प्रभावकारक ठरते.

नीरी केएफटी औषध दिल्याने मूत्रपिंड विकारग्रस्तांमध्ये क्रिएटिनिन, यूरिया तसेच यूरिक अँसिड चे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे. अभ्यासादरम्यान ज्या गटाला हे औषध देण्यात आले नव्हते, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल दिसून आला नसल्याचे समोर आले आहे.

विज्ञानासंबंधी सायन्स डायरेक्ट, गुगल स्कॉलर,एल्सवियर पबमेड तसेच स्प्रिंजर या पाच जर्नलच्या माहिती आधारे तज्ञांनी सर्वप्रथम मूत्रपिंडावर हर्बल औषधांच्या प्रभावासंबंधी रिसर्च पेपरचा अभ्यास केला. नंतर नीरी केएफटीची निवड करण्यात आली. एमिल फॉर्मास्युटिकष्टने भारतीय वैज्ञानिकांच्या सहकार्याने हे औषध बनवले आहे.

वेळेपूर्वीच या औषधाचा वापर सुरू केला, तर मूत्रपिंड खराब होण्यापासून वाचवता येवू शकते. तज्ञांच्या मते मूत्रपिंडाचा तीव्र विकारांनी (सीकेडी) मूत्रपिंड काम करणे जवळपास बंद करते.

रक्ताला शुद्ध करण्याची प्रक्रिया मूत्रपिंड करू शकत नाही.शरीरात त्यामुळे विषारी अपशिष्ठ जमा होवू लागतात. पंरतु,या औषधामुळे मूत्रपिंडाची कार्यक्षमता संपुष्टात येण्यापूर्वीच सक्रिय होत ते पुर्णत: निकामी होण्याच्या प्रक्रियेला मंद करते, असा दावा करण्यात आला आहे.

अशाचप्रकारे डायलिसिस वर असलेल्या रूग्णांची डायलिसिस संख्या कमी करण्यातही औषधामुळे मदत मिळते.

नीरी केएफटी ऑक्सिडेटिव्ह तसेच इंफ्लामेंट्री स्ट्रैस ला कमी करण्यात गुणकारक ठरत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. शरीरात जेव्हा अँटी ऑक्सीडेंट तसेच फ्री रेडिकल तत्वांचा ताळमेळ बिघडतो तेव्हा शरीरात ऑक्सीडेटिव्ह स्ट्रैस तयार होतात.

यामुळे शरीरात पॅथोजनच्या विरोधात लढण्याची क्षमता कमी होवू लागले. याचप्रकारे इंफ्लामेंट्ररी स्ट्रैस वाढल्याने शरीराचे रोगप्रतिरोधक तंत्र कुठल्याही रोगा विरोधात लढण्यात सक्षम राहत नाही.

नीरी केएफटी या दोन प्रकारच्या तणावाला दुरूस्त करण्यात प्रभावकारक ठरत असल्याचा दावा अभ्यासातून करण्यात आला आहे.औषधात अँटी ऑक्सीडेंट सह अनेक प्रभावी औषधी आहेत.केवळ किडनीच नाही तर यकृत देखील यामुळे बळकट होते.

हे अत्यंत प्रभावी तसेच यूनिक औषध आहे. अभ्यासातून हे अधिक प्रभावकारक असल्याचे दिसून आल्याचा दावा बनारस हिंदू विद्यापीठाचे बीएचयू प्रा.कमल नयन द्विवेदी यांच्याकडून करण्यात आला आहे.

Back to top button