पोस्ट विभागाकडून दहा दिवसांत एक कोटी तिरंग्यांची विक्री | पुढारी

पोस्ट विभागाकडून दहा दिवसांत एक कोटी तिरंग्यांची विक्री

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेसाठी पोस्ट विभागाकडून झेंडा विक्री केला जात असून गेल्या दहा दिवसांमध्ये सुमारे एक कोटी तिरंग्यांची विक्री झाल्याचे दळणवळण मंत्रालयाकडून शुक्रवारी सांगण्यात आले.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत पोस्ट कार्यालयांमध्ये झेंडा विक्री केली जात आहे. पोस्ट कार्यालयाकडून 25 रुपये या दराने झेंडा विकला जात आहे. देशाच्या कानाकोपर्‍यात पोस्टाची कार्यालये असून याच्या माध्यमातून अगदी दूरवरच्या भागातील लोकांनाही झेंडा मिळत आहे. 15 ऑगस्टपर्यंत पोस्ट कार्यालयांमध्ये झेंड्यांची विक्री केली जाणार असून ई पोस्ट यंत्रणेच्या माध्यमातून 1.75 लाख झेंड्यांची विक्री करण्यात आली आहे. देशभरात दीड लाख पोस्ट कार्यालये असून या कार्यालयांमार्फत एक कोटींच्या वर झेंड्यांची विक्री झाल्याचे दळणवळण मंत्रालयाकडून शुक्रवारी सांगण्यात आले. हर घर तिरंगा मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सामील व्हावे, असे आवाहन पोस्ट खात्याकडून करण्यात आले आहे.

हेहा वाचा : 

संबंधित बातम्या

Back to top button