Raksha Bandhan
Raksha Bandhan

Raksha Bandhan : प्रियांका गांधींनी बंधू राहुल गांधींसमवेत फोटो शेअर करत दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी बंधू राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या समवतचे बालपणीचे फोटो शेअर करत सर्वांना रक्षाबंधन सणाच्या (Raksha Bandhan) शुभेच्छा दिल्या आहेत.

आज देशभरात आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा होत आहे. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आपले बंधू राहुल गांधी यांच्यासमवेतचे लहानपणीचे फोटो कोलाज करुन ट्विट केले आहेत.  ट्विटमध्ये लिहले आहे, "तुम्हा सर्वांना भावा-बहिणीमधील प्रेम, विश्वास यांच प्रतीक असलेल्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा" (Raksha Bandhan) प्रियांका गांधी यांनी आपले लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रियांका गांधी यांना बुधवारी (दि.१०) दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्वतः प्रियांका गांधी यांनी ट्विट करत दिली.  आपली चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. घरीच स्वतःला आयसोलेट करणार असून सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, असे प्रियांका यांनी ट्विटमध्ये म्हटलं होते.

हेही वाचलंत  का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news