Corbevax booster dose : कोविशिल्ड, कोवॅक्सिन घेतलेल्यांना घेता येणार कोर्बेवॅक्सचा बूस्टर डोस | पुढारी

Corbevax booster dose : कोविशिल्ड, कोवॅक्सिन घेतलेल्यांना घेता येणार कोर्बेवॅक्सचा बूस्टर डोस

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्‍तसेवा: कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन लस घेतलेल्‍यांना आता बूस्टर डोस म्हणून कोर्बेवॅक्सचा डोस ( Corbevax booster dose)  घेता येणार आहे. मागील काही दिवसांत कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने व्यापक प्रमाणात बूस्टर डोस देण्याची मोहिम राबविली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोर्बेवॅक्सला बूस्टर डोस म्हणून देण्यात आलेली मान्यता महत्वपूर्ण ठरणार आहे. १८ वर्षांवरील सर्व लोकांना कोर्बेवॅक्स बूस्टर डोस घेता येईल.

Corbevax booster dose : लसीचा विकास बायोलॉजिकल ई कंपनीकडून

कोरोना नियंत्रणासाठीच्या कोर्बेवॅक्स लसीचा विकास बायोलॉजिकल ई कंपनीकडून करण्यात आलेला आहे. आपत्कालीन स्थितीत कोर्बोवॅक्सचा वापर करण्यास याआधी कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) परवानगी दिली होती. बायोलॉजिकल ई कंपनीने केंद्र सरकारला आतापर्यंत 100 दशलक्ष डोसेसचा पुरवठा केलेला आहे. टेक्सास चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि बायलर कॉलेज ऑफ मेडिसीन यांच्या मदतीने कोर्बेवॅक्स लस विकसित करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button