नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेने ( Corona Vaccine ) आज ( दि.१७ ) नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. या मोहिमेअंतर्गत कोरोना लसीकरणाने 200 कोटीचा आकडा आज पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत शुभेच्छा देत याला गौरवपूर्ण क्षण आहे, असे म्हटले आहे. केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयानुसार देशातील 98 टक्के ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीचा कमीत कमी एक डोस देण्यात आला आहे. तर 90 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 15-18 वर्ष वयाच्या 82 टक्के किशोरांना सुद्धा लसीकरणाचा एक डोस देण्यात आला आहे तर 68 टक्के किशोरांना दोन्ही डोस देण्यात आले आहे. या वयोगटासाठी लसीकरण अभियान तीन जानेवारीपासून सुरू झाले होते.
प्रधानमंत्रींनी आनंद व्यक्त केला
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या रेकॉर्डबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले कि भारतीयांनी विज्ञानावर विश्वास दाखवला आहे आणि देशातील चिकित्सक, नर्सेस आणि आघाडी सांभाळणारे कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी सुरक्षित पृथ्वी सुनिश्चित करण्यात आपली अहम भूमिका पार पाडली आहे.
प्रधानमंत्री ट्विट करून म्हणाले, "मी त्यांची भावना आणि दृढ निश्चयाचे कौतुक करतो. भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. कोरोना लसीकरणाचे 200 करोड डोस पूर्ण केल्याबद्दल सर्व भारतीयांना शुभेच्छा. या लसीकरण मोहिमेला व्यापक बनवण्यात आपले अद्वितीय योगदान देणा-यांवर गर्व आहे. याने कोविड-19 विरुद्ध सुरू असलेल्या वैश्विक लढाईला मजबूत केले आहे.
200 करोडचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय स्वास्थ्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, भारताने आज कोरोना लसीकरणाचा 200 करोडचे लक्ष्य पूर्ण केले आहे. देशासाठी ही गौरवान्वित करणारी बाब आहे. हे लक्ष्य आम्ही केवळ 18 महिन्यात पूर्ण केले आहे.
हेही वाचा: