Bihar : बनावट दारू पिल्याने बिहार मधील सारणमध्ये ९ लोकांचा मृत्यू; २८ जण गंभीर | पुढारी

Bihar : बनावट दारू पिल्याने बिहार मधील सारणमध्ये ९ लोकांचा मृत्यू; २८ जण गंभीर

पाटणा; पुढारी ऑनलाईन : बिहारमधील (Bihar) सारण जिल्ह्यातील मकरमध्ये बनावट दारू पिल्याने आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २८ जण गंभीर आजारी आहेत. तर १७ जणांचे डोळे गेले आहेत. मद्यपानामुळे मृत्यू झाल्याची माहिती येथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

बनावट दारूच्या सेवनामुळे गुरुवारी (दि.५ ऑगस्ट) मकरमध्ये (Bihar) सात जणांना जीव गमवावा लागला, तर शुक्रवारी (दि.६ ऑगस्ट) सकाळी पाटणा येथील पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. चंदन महतो, कमल महतो, ओमनाथ महतो, चंदेश्वर महतो, सकलदीप महतो, धनीलाल महतो, राजनाथ महतो आदींचा विषारी दारु पिल्याने मृत्यू झाला आहे.

ओमनाथ, चंदेश्वर, धानी आणि सकलदीप यांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. तर चंदन महोतो याचा घरीच मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांनी पोस्टमार्टम न करताच त्यांचा अत्यंविधी केला. या घटनेच्या चौकशीसाठी स्वत: जिल्हा पोलिस प्रमुख गावात ठाण मांडून आहेत. (Bihar)

बनवाट दारुच्या सेवनात बळी पडलेले लोक बहुतांशी मेकर आणि भेंडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक गावांतील रहिवासी आहेत. त्यापैकी बहुतेकांनी धानुका टोली गावातून बनावट दारू खरेदी केल्याची माहिती आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, छापरा शहरातील सदर हॉस्पिटलमध्ये सध्या अकरा जणांवर उपचार सुरू आहेत. इतर अनेकांना पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सारणचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांनी सांगितले की, अधिकारी बनावट दारू बनवणाऱ्या आणि वितरीत करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी मेकर, मरहौरा आणि भेंडी पोलिस ठाण्यांखालील भागात छापे टाकत आहेत.

Back to top button