Commonwealth Games 2022 : कुस्तीत पदकांचा पडणार पाऊस... बजरंगसह चार पैलवान अंतिम फेरीत | पुढारी

Commonwealth Games 2022 : कुस्तीत पदकांचा पडणार पाऊस... बजरंगसह चार पैलवान अंतिम फेरीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी खुशखबर आहे. आजपासून सुरू झालेल्या कुस्तीची स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी करत देशासाठी पदक निश्चित केले. आज भारताचे सहा पैलवान मॅटवर उतरले. यामध्ये दीपक पुनिया, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दिव्या काकरन, अंशू मलिक आणि मोहित यांचा समावेश होता. यापैकी दीपक, बजरंग, अंशू आणि साक्षी यांनी अंतिम फेरीत धडक मारली असून दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवाल कांस्यपदकासाठी लढतील.

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 20 पदके जिंकली आहेत. यामध्ये सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. याशिवाय सात भारतीय बॉक्सर्सनीही आपली पदकं निश्चित केली आहेत. अशा प्रकारे भारताला किमान 27 पदके मिळण्याची खात्री आहे. आठव्या दिवशी भावीनाने पॅरा टेबल टेनिसच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला असून पदक निश्चित झाले आहे. पुरुष रिले शर्यतीचा संघही अंतिम फेरीत पोहोचला आहे.

2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय कुस्तीपटूंची कामगिरी नेत्रदीपक होती. त्यावेळी भारताने एकूण 12 पदके जिंकली, ज्यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश होता. अशा स्थितीत यावेळीही भारतीय कुस्तीपटूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Back to top button