

पाटणा : वृत्तसंस्था 2 ते 15 ऑगस्ट या काळात सोशल मीडिया अकाऊंटवर 'प्रोफाईल पिक' म्हणून तिरंगा ध्वज ठेवा आणि 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी होण्यासाठी इतरांना प्रेरित करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या काळात केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा'हे अभियान चालवले आहे. डिस्प्ले पिक्चरमध्ये तिरंगा लावून दुसर्यांनाही या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करा. देशाला जोडण्यासह तिरंगा सर्वांना राष्ट्रसेवेत समर्पित होण्यासाठी प्रेरणा देत असतो, असेही शहा म्हणाले.