ATF Price : विमान कंपन्यांना दिलासा; ‘एटीएफ’ दरात 12 टक्क्यांची कपात | पुढारी

ATF Price : विमान कंपन्यांना दिलासा; 'एटीएफ' दरात 12 टक्क्यांची कपात

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : 
विमानाच्या इंधन दरात अर्थात एटीएफमध्ये (ATF Price) बारा टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घेतला आहे. वाढीव इंधन दरामुळे त्रस्त असलेल्या विमान कंपन्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ताज्या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये एटीएफचे प्रती किलो लीटरचे दर 1.21 लाख रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

तेल कंपन्यांनी याआधी 16 जुलै रोजी एटीएफ दरात 2.2 टक्क्यांची कपात केली होती. त्यावेळी एटीएफचे दर 1 लाख 38 हजार 148 रुपये इतके होते. बारा टक्क्यांनी करण्यात आलेल्या कपातीनंतर कोलकाता येथे विमानाच्या इंधनाचे दर 1 लाख 28 हजार 425 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मुंबईत हेच दर 1 लाख 20 हजार 915 रुपयांपर्यंत तर चेन्नई येथे 1 लाख 26 हजार 516 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्या विमानांसाठी दिल्लीत एटीएफचे दर 1161 डॉलर्स इतके ठेवण्यात आले असून, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे हे दर क्रमशः 1201 डॉलर्स, 1157 डॉलर्स व 1156 डॉलर्स इतके निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चालू वर्षात तिसऱ्यांदा एटीएफ दरात कपात करण्यात आलेली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button