व्यावसायिक गॅस सिलिंडरच्‍या दरात 36 रुपयांची कपात, घरगुती गॅस सिलिंडरचे दर 'जैसे थे' | पुढारी

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्‍या दरात 36 रुपयांची कपात, घरगुती गॅस सिलिंडरचे दर 'जैसे थे'

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर दरात ३६ रुपयांची कपात केली आहे. दुसरीकडे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत. ताज्या कपातीनंतर व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर 2012.50 रुपयांवरून 1976.50 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर 1053 रुपयांवर स्थिर आहेत.

जागतिक बाजारातील इंधन दराचा आढावा घेऊन दर महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात बदल केले जातात. त्यानुसार ऑगस्टच्या सुरुवातीला व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचे दर याआधी 19 मे रोजी बदलले होते. त्यावेळी मुंबईत हे दर 1003 रुपयांवरून 1053 रुपयांवर नेण्यात आले होते. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील काही काळापासून स्थिर ठेवलेले आहेत. सध्या दिल्लीत एक लीटर पेट्रोल व डिझेलचे दर क्रमशः 96.72 आणि 89.62 रुपयांवर आहेत.

हेही वाचा :

 

Back to top button