पुढारी ऑनलाइन डेस्क : अंचिता शेऊली याने वेटलिफ्टिंगमध्ये केलेल्या सुवर्ण कामगिरी नंतर भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तर दोन रौप्य आणि एक कांस्य पदक असे एकूण 6 पदक मिळाले आहे. या पदकांसह भारत पदतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. लवकरच भारत टॉप 5 मध्ये येऊ शकतो.
हे आहे राष्ट्रकुलमधील 'गोल्डन' अचिवर
तत्पुर्वी भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या दुस-या दिवशी वेटलिफ्टिंग स्पर्धेत संकेत सरगरने रौप्य पदक पटकावून भारताचे खाते उघडले. 55 किलो पुरुष गटात त्याने ही कामगिरी केली. सुवर्ण थोडक्यात हुकले. मात्र त्याची कामगिरी महत्वाची ठरली. तर महिला गटात बिंदिया राणी ने आश्चर्यकारक कामगिरी करत 55 किलो वजन गटात रौप्य पदक मिळवले. तर गुरुराज याने 61 किलो वजन गटात 269 किलो वजन उचलून कांस्यपदक प्राप्त केले.
भारताला आतापर्यंत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळाले आहेत. यामुळे भारत हा पदतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक पदके ऑस्ट्रेलियाने पटकावली आहे.