Commonwealth Games 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये अंचिता शेउलीची सुवर्ण कामगिरी; भारताची आतापर्यंत 6 पदकांची कमाई

Commonwealth Games 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये अंचिता शेउलीची सुवर्ण कामगिरी; भारताची आतापर्यंत 6 पदकांची कमाई

पुढारी ऑनलाइन डेस्क : वेटलिफ्टिंगमध्ये अंचिता शेऊलीने सुवर्ण पदक पटकावत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक खेचून आणले आहे. बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर अंचिता शेउली याने 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

एकूण तीन स्नॅचमध्ये त्याने ही कामगिरी केली. पहिल्या फेरीत 137 दुस-या फेरीत 139 तर तिस-या फेरीत 143 किलो वजन उचलत त्याने सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. राष्ट्रकूल स्पर्धेत भारताकडून सुवर्ण जिंकणारा अंचित तिसरा खेळाडू आहे. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले. भारताला आतापर्यंत 6 पदके मिळाली असून सर्व पदक हे वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news