मुख्यमंत्री शिंदेंना ‘रिपाई’मध्ये सामिल होण्याची ऑफर! रामदास आठवले म्हणाले... | पुढारी

मुख्यमंत्री शिंदेंना ‘रिपाई’मध्ये सामिल होण्याची ऑफर! रामदास आठवले म्हणाले...

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री माझ्या पक्षात आल्यास मला आनंद होईल. शिवसैनिक रिपाईत सामिल झाले तर मी टेबलावर उभा राहुन सर्वांचे स्वागत करेन, अशी भावना व्यक्त करीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांना आपल्या पक्षात सामिल होण्याची ‘ऑफर’ दिली. शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना ‘खरी’ आहे आणि ठाकरेंची शिवसेना ‘बरी’आहे, अशा शब्दात त्यांनी शिवसेनतील अंतर्गत वादावर भाष्य केले.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात तांत्रिक अडचणी असतील तरी विस्तार आणि अधिवेशन झाले पाहिजे.येत्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.ऑगस्टचा पहिल्या आठवड्यात अधिवेशन होवू शकते,असे भाकित देखील आठवले यांनी वर्तवले. नवीन मंत्रिमंडळात रिपाईला एक मंत्रीपद द्यावे, या मागणीचा पुनरोच्चार करीत ही मागणी भाजप तसेच एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवल्याचे आठवले म्हणाले.

दरम्यान, कॉंग्रेस नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य चा खरपूस समाचार घेतांना आठवले म्हणाले, ”त्यांचे नाव अधीर आहे, परंतु डोक बधिर आहे”, सोनिया गांधी यांनी त्यांना पदावरून हटवावे अशी मागणी त्यांनी केली.अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पंरतु, असे बोलणे योग्य नाही अशी भूमिका व्यक्त करीत त्यांनी चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

हेही वाचलंत का?

Back to top button