अमेरिका गोळीबाराने पुन्हा हादरली; लॉस एंजेलिस पार्कमधील गोळीबारात २ ठार, ५ जखमी | पुढारी

अमेरिका गोळीबाराने पुन्हा हादरली; लॉस एंजेलिस पार्कमधील गोळीबारात २ ठार, ५ जखमी

लॉस एंजलिस (अमेरिका); पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील एका पार्कमध्ये ( Los Angeles park) दोन गटांत झालेल्या गोळीबारात दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी संध्याकाळी ४ वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू असलेल्या कार शोदरम्यान सॅन पेड्रोमधील पेक पार्कमध्ये गोळीबार झाला. पेक पार्कमध्ये दोन गटांत झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत. एकापेक्षा जास्त शूटर असू शकतात, असे लॉस एंजेलिस पोलिस विभागाचे कॅप्टन केली मुनिझ यांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणाला ताब्यात घेण्यात आलेले नाही.

कार शो दरम्यान झालेल्या गोळीबारात दोनजण ठार झाले. तर पाच जण जखमी झाले असल्याची माहिती लॉस एंजेलिस अग्निशमन विभागाने दिली आहे. अग्निशमन विभागाचे प्रवक्ते ब्रायन हम्फ्रे यांनी सांगितले की, पॅरामेडिक्सने सात जखमींनी रुग्णालयात दाखल केले होते आणि त्यापैकी एक पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. चार पुरुष आणि तीन महिलांवर गोळीबार झाला असून ते २३ ते ५४ वयोगटातील आहेत.

कार शो हा अधिकृतपणे नियोजित कार्यक्रमाऐवजी एक अनौपचारिक मेळावा स्वरुपात होता. हा कार शो हा दक्षिण कॅलिफोर्निया कार संस्कृतीचा एक भाग आहे. क्लासिक कारचे मालक आणि रायडर्स अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी कार शो आयोजित करतात. city’s parks and recreation website च्या वेबसाइटनुसार, पेक पार्क हे सॅन पेड्रोमधील एक सामुदायिक केंद्र आहे. ज्यात बेसबॉल डायमंड, स्केटबोर्ड पार्क, व्यायामशाळा आहे.

Back to top button