COVID19 | देशातील कोरोना मृतांचा आकडा वाढला, २४ तासांत २१,४११ नवे रुग्ण, ६७ मृत्यू | पुढारी

COVID19 | देशातील कोरोना मृतांचा आकडा वाढला, २४ तासांत २१,४११ नवे रुग्ण, ६७ मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना (COVID19) रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु आहे. पण मृतांचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २१,४११ नवे रुग्ण आढळून आले. तर ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १ लाख ५० हजार १०० सक्रिय रुग्ण आहेत. तर शनिवारी दैनंदिन कोरोनासंसर्ग दर ४.४६ टक्के आहे. एका दिवसात २० हजार ७२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात गुरूवारी दिवसभरात २१ हजार ८८० कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ६० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, २१ हजार २१९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.४६ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ४.४२ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ४.५१ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशातील एकूण ४ कोटी ३१ लाख ९२ हजार ३७९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १ लाख ५० हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २५ हजार ९९७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात आतापर्यंत २०१ कोटी ६८ लाख १४ हजार ७७१ कोरोना डोस देण्यात आले आहेत. यातील ३.८३ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत ६ कोटी ६३ हजार ४६ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ७० लाख ३२ हजार ३२५ डोस पैकी ८ कोटी ७ लाख ८८ हजार ८९० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

Back to top button