कोरोनाची क्षमता कमी करण्याबाबत नवे संशोधन | पुढारी

कोरोनाची क्षमता कमी करण्याबाबत नवे संशोधन

नवी दिल्ली : भारतीय संशोधकांनी सिंथेटिक पेप्टाईडस्च्या एका नव्या वर्गाच्या संरचनेचा खुलासा केला आहे. ही पेप्टाईड संरचना ‘कोव्हिड-19’ला जबाबदार असणार्‍या ‘सार्स-कोव्ह-2’ या कोरोना विषाणूची क्षमता कमी करू शकते. या संरचनेमुळे कोरोनाचा पेशींमधील प्रवेश बाधित होण्याबरोबरच व्हायरॉन्सना जोडू शकते. संपूर्ण व्हायरस (विषाणूू) कणांना ‘व्हायरॉन’ असे म्हटले जाते, ज्यामध्ये आरएनए किंवा डीएनए कोअर असतो.

व्हायरॉनच्या बाह्य आवरणाबरोबर प्रोटिनचा एक स्तर असतो जो विषाणूचा बाह्य संक्रामक रूप असतो. कोरोना विषाणूची नवी रूपे वेगाने उदयास आल्यास ‘कोव्हिड-19’ लसीद्वारे दिली गेलेली सुरक्षा कमी होऊ शकते. त्यामुळे विषाणू संक्रमण रोखण्यासाठी नव्या पद्धती शोधणे अनिवार्य झाले होते. संशोधकांचे म्हणणे आहे की या संशोधनातून निर्माण झालेला नवा द़ृष्टिकोण ‘सार्स-कोव्ह-2’सारख्या विषाणूला निष्क्रिय करण्यासाठी एक वैकल्पिक पद्धत देतो.

ज्यामुळे पेप्टाईडसाठी एका नव्या वर्गाला अँटिव्हायरलच्या रूपात विकसित करण्याचा मार्ग विकसित होऊ शकतो. बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थान (आयआयएससी) च्या वैज्ञानिकांनी सीएसआयआर-मायक्रोबियल तंत्रज्ञान संस्थेतील संशोधकांच्या सहयोगाने पेप्टाईड्सचे डिझाईन करण्यासाठी या दृष्टीकोणाचा वापर केला आहे. तो ‘सार्स-कोव्ह-2’च्या पृष्ठभागावर स्पाईक प्रोटिनला बंधन घालू शकतो. ‘नेचर केमिकल बायोलॉजी’ नियतकालिकात या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.

Back to top button