Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस उपराष्ट्रपती निवडणुकीपासून राहणार दूर | पुढारी

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस उपराष्ट्रपती निवडणुकीपासून राहणार दूर

कोलकाता; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रपती निवडणुकीत यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या बैठकीनंतर पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी अशी घोषणा केली की, तृणमूल काँग्रेस उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहिल. यावेळी अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना तुम्ही जगदीप धनखड यांना पाठिंबा देणार का असा सवाल विचारण्यात आल्यावर ते म्हणाले त्यांचा पाठिंबा देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी (Vice President Election 2022) ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. विरोधी पक्षांकडून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गरेट अल्वा (Margaret Alva) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर एनडीएकडून पंश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या बैठकीची माहिती देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले,‘उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार धनखड यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही या निवडणुकीपासून दूरच राहणार आहोत.’ (Mamata Banerjee)

राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. यानंतर सर्व विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांचे नाव सर्वसहमतीने संमत करण्यात आले होते. तेव्हा या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली जावी, असा प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी ठेवला होता. विरोधकांची मोठ बांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी चांगलाच पुढाकार घेतला होता. विरोधकांमध्ये ममता बॅनर्जी यांना घेऊन मतभेद व संर्भमावस्था होती. कम्युनिस्ट पक्षांनी ममता बॅनर्जी यांच्या पुढाकारावर आणि नेतृत्वावर टीका देखिल केली होती.

राष्ट्रपती निवडणुकीत घेतलेला पुढाकार आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची घेतलेली माघार या निर्णयांमुळे पुन्हा एकदा विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचे समोर येत आहे. शिवाय तृणमूल काँग्रेसच्या अशा निर्णयामुळे राजकीय वर्तुळात देखिल गोंधळ निर्माण झाला आहे.

Back to top button