Monkeypox Case : केरळमध्‍ये आढळला मंकीपॉक्‍सचा दुसरा रुग्‍ण | पुढारी

Monkeypox Case : केरळमध्‍ये आढळला मंकीपॉक्‍सचा दुसरा रुग्‍ण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केरळ राज्‍यातील कन्‍नूर जिल्‍ह्यात मंकीपॉक्‍सचा दुसरा रुग्‍ण आढळला आहे. यापूर्वी १४ जुलै राजी मंकीपॉक्‍सचा रुग्‍ण केरळमधील कोल्‍लाम जिल्‍ह्यात सापडला होता. यानंतर अवघ्‍या चार दिवसांमध्‍ये दुसरा रुग्‍ण आढळल्‍याने खळबळ माजली आहे. आरोग्‍य मंत्रालयाने सर्व राज्‍यांमधील विमानतळ, रेल्‍वे स्‍थानकांसह राज्‍यांची प्रवेशव्‍दार असणार्‍या शहरांमध्‍ये तपासणी यंत्रणा वाढविण्‍याचे निर्देश दिले आहेत.

रुग्‍णाच्‍या संपकार्कात आलेल्‍यांची तपासणी

केरळचे आरोग्‍य मंत्री वीणा जॉर्ज यांनी माहिती देताना सांगितले की, राज्‍यात मंकीपॉक्‍सचा आणखी एक रुग्‍ण सापडला आहे. यापूर्वी संयुक्‍त अरब अमिरातहून आलेल्‍या रुग्‍णाला मंकीपॉक्‍सची बाधा झाल्‍याचे तपासणीत स्‍पष्‍ट झाले होते. मात्र आता कन्‍नूर जिल्‍ह्यातील ३१ वर्षीय रुग्‍णाला मंकीपॉक्‍सची लागण झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍याच्‍यावर परियारम मेडिकल कॉलेजमध्‍ये उपचार सुरु आहेत. संबंधित रुग्‍णाची प्रकृती ठीक असून त्‍याच्‍या संपर्कात आलेल्‍या सर्वांची तपासणी करण्‍यात येत आहे. हा रुग्‍ण ३१ मे रोजी कन्‍नूरमध्‍ये आला आहे. मात्र यापूर्वी त्‍याने केलेल्‍या प्रवासाची माहिती घेतली जात आहे.

१४ जुलै राजी मंकीपॉक्‍सचा रुग्‍ण केरळमधील कोल्‍लाम जिल्‍ह्यात सापडला होता. याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने घेतली होती. संसर्ग टाळण्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीय प्रवास केलेल्‍यांनी रुग्‍णांसह मृत व जिंवत प्राण्‍याच्‍या संपर्कात येवू नये, केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले होते. यावर्षी कोरोनानंतर मंकीपॉक्‍सचा धोका असल्‍याचा इशारा जागतिक आरोग्‍य संघटनेने दिला होता. आतापर्यंत ६० देशांमध्‍ये मंकीपॉक्‍सचे सुमारे ६ हजार रुग्‍ण आढळले आहेत. तर यातील तिघांचा मृत्‍यू यामुळे झाला आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button