देशात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ, १८ हजार ८४० नवे रुग्ण; ४३ मृत्यू | पुढारी

देशात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ, १८ हजार ८४० नवे रुग्ण; ४३ मृत्यू

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात १८ हजार ८४० कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ४३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान, १६ हजार १०४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली.
शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.५१ टक्के नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ४.१४% आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ४.०९% नोंदवण्यात आला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ३६ लाख ४ हजार ३९४ पर्यंत पोहोचली आहे. यातील ४ कोटी २९ लाख ५३ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १ लाख २५ हजार २८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २५ हजार ३८६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९८ कोटी ६५ लाख ३६ हजार २८८ डोस देण्यात आले आहेत. तर, ३.७४ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी ९२ लाख ७२ हजार ८२२ बूस्टर डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १० कोटी ४२ लाख १४ हजार ५९० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८६ कोटी ६१ लाख ७७ हजार ९३७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.यातील ४ लाख ५४ हजार ७७८ तपासण्या शुक्रवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

देशातील बूस्टर डोसची स्थिती

     श्रेणी                       बूस्टर डोस
१) आरोग्य कर्मचारी       ५८,३८,६२४
२) फ्रंटलाईन वर्कर्स      १,०८,०९,४७६
३) १८ ते ४४ वयोगट     ३८,०२,६६९
४) ४५ ते ५९ वयोगट     २९,६८,६६५
५) ६० वर्षांहून अधिक   २,५८,५३,३८८

हेही वाचा

Back to top button