‘ई-फायलिंग’ संदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांचे इन्‍फोसिस सीईओंना समन्‍स | पुढारी

'ई-फायलिंग' संदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांचे इन्‍फोसिस सीईओंना समन्‍स

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन: गेली अडीच महिन्‍यांपासून आयकर ‘ई-फायलिंग’ संकेतस्‍थळावर नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. याची केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत इन्‍फोसिसचचे सीईओ सलील पारेख यांना सोमवारी (दि.२३) हजर राहण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.

‘ई-फायलिंग’ संकेतस्‍थळाविरोधात नागरिकांच्‍या अनेक तक्रारी आहेत. आयकर भरण्‍यासाठी ही नवी प्रकिृया सुरु होऊन अडीच महिने झाले तरी ई-फायलिंग संकेतस्‍थळावरील समस्‍यांचे निराकरण झालेले नाही, याचे सष्‍टीकरण इन्‍फोसिसचचे सीईओ सलील पारेख यांना द्‍यावे लागणार आहे.

देशभरात आयकर विवरणपत्र भरण्‍याची प्रक्रिया सोपी आणि जलद व्‍हावी, या हेतूने ७ जूनला ‘ई-फायलिंग’ची सुविधा सुरु
करण्‍यात आली होती.

गेली अडीच महिने करदात्‍यांना ही विवरणपत्र भरण्‍याची प्रक्रिया पार पाडताना अनेक समस्‍यांना तोंड द्‍यावे लागत आहे. वापरकर्ते याचा स्‍क्रीनशॉट घेवून थेट केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे तक्रार करत आहेत.

ही वेबसाईट इन्‍फोसिस टेक्‍नॉलॉजीने विकसित केली आहे. इन्‍फोसिसचे अध्‍यक्ष नंदन नीलेकणी यांनीही यासंदर्भात येणार्‍या समस्‍याचे तात्‍काळ निवारण करावे, अशी सूचना दिली होती.

रविवारी आयकर विाभागाने केलेल्‍या ट्‍विटमध्‍ये म्‍हटले आहे की, अर्थ मंत्रालयाने ‘ई-फायलिंग’साठी येणार्‍या अडचणींबाबत
इन्‍फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना २३ ऑगस्‍ट रोजी हजर राहण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत.

यावेळी अडीच महिन्‍यांनतरही समस्‍यांचे निकारण का झाले नाही, याचा खुलासा पारेख यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना द्‍यावा लागणार आहे.

जानेवारी २०१९ ते जून २०२१ या कालावधीत केंद्र सरकारने इन्‍फोसिसला बेवसाईट विकसित करण्‍यासाठी तब्‍बल १६४.५ कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button