मोहम्मद झुबेरला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन | पुढारी

मोहम्मद झुबेरला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : जातीय तेढ वाढविण्याचा गंभीर आरोप असलेला अल्ट न्यूजचा मालक मोहम्मद झुबेर याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. उत्तर प्रदेशातील सीतापूर तसेच दिल्लीमध्ये त्याच्याविरोधात ‘हेट स्पीच’चे गुन्हे दाखल आहेत. सीतापूरमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल झुबेरला जामीन मंजूर झाला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने झुबेरविरोधातला गुन्हा रद्दबातल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. झुबेरच्या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना नोटीस बजावली आहे. झुबेरला १७ जून रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. हिंदू देव-देवतांविरोधात २०१८ साली आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल त्याला ही अटक झाली होती.

Back to top button