सर्वसामान्‍यांना मिळणार दिलासा, पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता | पुढारी

सर्वसामान्‍यांना मिळणार दिलासा, पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर शंभर डॉलर्स प्रती डॉलर्सपर्यंत खाली आल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलचे दर कमी केली जाण्याची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे पाम तेलाच्या दरातही घसरण सुरु असल्याने केंद्र सरकारने खाद्यतेल उत्पादक कंपन्यांवरील दर कमी करण्यासाठीचा दबाव वाढविला आहे.

मध्यंतरीच्या काळात जागतिक बाजारात क्रूड तेलाचे दर 120 डॉलर्स प्रती बॅरलवर गेले होते. जागतिक मंदीची शक्यता तसेच पुरवठा व्यवस्था सुरळीत होत असल्याने हे दर आता शंभर डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. क्रूड तेलाच्या दराची घसरण कायम राहिली तर तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल दरात कपात करून महागाईने होरपळत असलेल्या जनतेला दिलासा दिला जाऊ शकतो. दरम्यान गत महिनाभरात खाद्यतेलाचे दर टनामागे ३०० ते ४५० डॉलर्सने कमी झाल्याने देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलाचे दरसुद्धा कमी होण्याची शक्यता वाढली आहे. येत्या काळात खाद्यतेलाचे दर लीटरमागे 10 ते 15 रुपयांनी कमी होऊ शकतात, असा अंदाज सॉल्वंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे (एसईए) कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर घसरले असले तरी त्याचा थेट फायदा देशातील सामान्य ग्राहकांना झालेला नाही. गत महिन्यात केंद्र सरकारच्या आदेशानुसार खाद्यतेल कंपन्यांनी दरात किरकोळ कपात केली होती. आता सरकारने दर कपातीसाठीचा कंपन्यांवरील दबाव वाढविला आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button