New Delhi: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजय पाण्डेंनी नोंदवला ईडीसमोर जबाब | पुढारी

New Delhi: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजय पाण्डेंनी नोंदवला ईडीसमोर जबाब

नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांण्डे यांनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीसमोर मंगळवारी (दि.०५) जबाब नोंदवला. दिल्लीतील ईडी कार्यालयात, त्यांनी हा जबाब नोंदवला. यापूर्वी ईडीने त्यांना ३ जुलैला चौकशीसाठी बोलावले होते. आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स काढला होता. पीएमएलए कायद्यांतर्गत त्यांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१९८६ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी संजय पाण्डे यांचा मुंबई पोलिस आयुक्तपदाचा कार्यकाळ वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ३० जून रोजी ते निवृत्त झाले. तीन दिवसांनी त्यांना ईडीने समन्स पाठवून हजर केले होते.

स्वत:च्या कंपनीकडूनच केले ऑडिट

संजय पांडे यांनी चित्रा रामकृष्ण प्रकरणात ऑडिट कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी फक्त पांडे यांची होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संजय पांडे यांची चौकशी त्यांच्या कंपनी इसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडच्या कामकाजाशी संबंधित आहे. एजन्सीने या प्रकरणी एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांचे बयान आधीच नोंदवले आहेत. रामकृष्ण सध्या तिहार तुरुंगात आहेत. एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी त्याला आणि समूहाचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मार्चमध्ये अटक केली होती.

हेही वाचा:

Back to top button