गोव्यात ९ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस : हवामान विभागाचा अंदाज | पुढारी

गोव्यात ९ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस : हवामान विभागाचा अंदाज

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा राज्याला पावसाने झोडपने सुरूच केले असून, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ९ जुलैपर्यंत राज्यात धुवॉधार पाऊस पडणार आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यात जोरदार पाऊस पडत असून, नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. रस्ते जलमय झाले असून, राज्यातील नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची वेळ सरकारी यंत्रणावर आलेली आहे.

गोवा परिसरातील अनेक ठिकाणी पावसामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून रस्ते पाण्याने भरले आहेत. जोरदार पावसासह वादळी वारे होत असल्यामुळे झाडांची पडझड होत आहे.  झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडीसोबत अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला आहे. शाळात मुलांच्या उपस्थितीवर परिणाम झालेला आहे. आठवडी बाजारासह उघड्यावर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पावसाचा परिणाम झाला आहे. राज्यातील धरणांमध्ये बरेच पाणी साठवले आहे. जोरदार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आलेला असून, अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. या सगळ्यामुळे लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

राज्यात आतापर्यंत ३६ इंच पाऊस नोंद झाली असून,  ही टक्‍केवारी तेरानेअधिक असल्‍याचे हवामान खात्याने सांगितले आहे. अजूनही पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असल्यामुळे सरकारची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button