COVID19 | देशात कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट वाढला, सक्रिय रुग्णसंख्या १ लाख ९ हजारांवर | पुढारी

COVID19 | देशात कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट वाढला, सक्रिय रुग्णसंख्या १ लाख ९ हजारांवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (COVID19) संख्येत चढ-उतार सुरु आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७,०९२ नवे रुग्ण आढळून आले. तर २९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिया रुग्णसंख्या १ लाख ९ हजार ५६८ वर पोहोचली आहे. काल एका दिवसात १४,६८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशातील दैनंदिन कोरोनासंसर्गदर पुन्हा वाढला असून तो ४.१४ टक्क्यांवर गेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गुरूवारी दिवसभरात १७ हजार ७० कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १४ हजार ४१३ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.५५ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ३.४० टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ३.५९ टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात (COVID19) सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९७ कोटी ८४ लाख ८० हजार १५ डोस देण्यात आले आहेत. यातील ९ लाख ९ हजार ७७६ डोस काल एका दिवसात देण्यात आले आहेत. आतापर्यंत ३.६७ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील मुलांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून ४ कोटी ६० लाख ८२ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना १९३.५३ कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत, असे केंद्र सरकारकडून शनिवारी सांगण्यात आले आहे.

सातारकरांची धास्ती पुन्हा वाढली; कोरोनाबाधितांची संख्या ११० वर

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे नवे ३० रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे उपचार घेणार्‍या बाधितांची रुग्णसंख्या ११० वर पोहोचली आहे. पॉझिटिव्हिटी रेट हा ६.४१ टक्क्यांवर गेला आहे. आज मितीस ११ रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे आता सातारकरांना धास्ती लागून राहिली आहे.

Back to top button