मी पळपुटा नाही म्हणत संजय राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर  | पुढारी

 मी पळपुटा नाही म्हणत संजय राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर 

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना खासदार संजय राऊत आज १२ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. त्यात्पुर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केले आहे की, “मी पळपुटा नाही, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार. तेवढी माझ्यात हिंमत आहे”
ईडी कार्यालयात दाखल होण्यापुर्वी संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत त्यांनी सांगितले होते की, ” मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे.” त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहनही केले आहे की, कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयात जमू नये. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना २७ जूनला समन्स बजावले होते, पण संजय राऊत नियोजित दौऱ्यामुळे ईडीसमोर चौकशीला हजर राहू शकले नाहीत. त्यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी उपस्थित राहून विनंती अर्ज सादर केला.

केंद्रीय तपास यंत्रणेवर माझा पुर्ण विश्वास – संजय राऊत 

आज १२ वाजता ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याची माझी हिंमत आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. केंद्रीय तपास यंत्रणेवर माझा पुर्ण विश्वास आहे. असेही त्यांनी वक्तव्य केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button