LPG Cylinder Price : दिलासा! एलपीजी गॅस सिलिंडर दरात मोठी कपात | पुढारी

LPG Cylinder Price : दिलासा! एलपीजी गॅस सिलिंडर दरात मोठी कपात

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर दरात (commercial LPG Cylinder Price) १९८ रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा नवीन दर १ जुलै पासून लागू होईल. या दर कपातीमुळे १९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचा दर दिल्लीत २,०२१ रुपयांवर आला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडर १९८ रुपयांनी स्वस्त झाल्याने रेस्टॉरंट्स, भोजनालये, चहाचे स्टॉल्स आणि इतरांना दिलासा मिळाला आहे. याआधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या (commercial LPG Cylinder Price) किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. १ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १०२.५० रुपयांनी वाढून २,३५५.५० रुपयांवर पोहोचली होती. एप्रिल आणि मार्चमध्येही १९ किलो व्यावसायिक एलपीजीची किमती अनुक्रमे २५० रुपये आणि १०५ रुपयांनी वाढली होती.

याआधी घरगुती एलपीजी सिलिंडर जोडणी महागली आहे. यामुळे १४.२ किलो वजनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन जोडणीसाठी ग्राहकांना २ हजार २०० रुपये मोजावे लागत आहेत. जोडणी शुल्कातील ही वाढ ७७० रुपयांची आहे.

 हे ही वाचा :

Back to top button