घरगुती गॅस सिलिंडरची नवीन जोडणी महागली | पुढारी

घरगुती गॅस सिलिंडरची नवीन जोडणी महागली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आता घरगुती एलपीजी सिलिंडर जोडणी घेणे गुरुवारपासून महागणार आहे. 14.2 किलो वजनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन जोडणीसाठी ग्राहकांना 2 हजार 200 रुपये मोजावे लागतील. आतापर्यंत नवीन जोडणीसाठी 1 हजार 450 रुपये आकारले जात होते. म्हणजे जोडणी शुल्कात तब्बल 770 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षा ठेव 2 हजार 200 रुपये असेल. यासह रेग्युलेटरकरिता 250 रुपये, पासबुककरिता 25 रुपये आणि पाईपसाठी 150 रुपये द्यावे लागतील.

या हिशेबाने सिलिंडर कनेक्शन तसेच पहिला सिलिंडर ग्राहकांना 3 हजार 690 रुपयांचा पडेल. सुरक्षा ठेव 800 रुपयांऐवजी 1 हजार 150 रुपये भरावी लागेल. दोन सिलिंडरची जोडणी घेणार्‍यांना 4 हजार 400 रुपयांची सुरक्षा ठेव आता जमा करावी लागेल.

Back to top button